माणसाचं व्यक्तीमत्व बर्याचदा इतरांच्या प्रभावाने प्रेरित झालेलं असतं तसं ते गैरही नसतं
पण तुम्ही खरे जसे असता तसं असणं जास्त गरजेचे असतं. तुम्हाला जसं असायला हवे असं वाटतं तसं तुम्ही असावं. तुम्हाला वाटतं तसं तुम्ही व्हाल असही नाही पण प्रयत्नशील असणं महत्त्वाचं. पेला अर्धा रिकामा की अर्धा भरलेला यामध्ये रिकाम्या पेल्याचं भान ठेवून भरलेला पेलाच बघणं अधिक संयुक्तिक ठरतं. प्रभावाचं स्वतंत्र क्षेत्र असतं त्याच्या कक्षेत आलेलं आपलसं करणं हे प्रभावाचं वैशिष्ट्य असतं. आईनस्टाईन म्हणतो “मुल्यावरील निष्ठांना पर्याय असूच शकत नाही”. मुळात मुल्य समजली पाहिजेत. स्वतःची मुल्य ठरवता आली पाहिजेत. स्वतःचं एक क्षेत्र असतं त्यामध्ये कोणता प्रभाव पडावा आणि कोणता पडू नये याचं नियंत्रण तुमची मुल्यावरील निष्ठाच करत असते.तुमची मुल्य आणि त्यावरील निष्ठा तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व ठरवत असते.